मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आरोग्य सेवांना बळ

CD

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे
आरोग्यसेवेला बळ

राज्य सरकारचा एआयसाठी करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने वाधवानी एआय या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झाला. या करारामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून क्षयरोग, मातृ-बाल आरोग्य, प्राथमिक आरोग्यसेवा आणि ई-हेल्थ क्षेत्राला बळ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की डिजिटल महाराष्ट्र आता पुढच्या टप्प्यात जात आहे आणि एआयमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होईल. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, की एआयमुळे रोगांचे लवकर निदान, रुग्णांना सुलभ सेवा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळेल. वाधवानी एआयचे प्रमुख शेखर शिव सुब्रमणियन यांनी सांगितले, की महाराष्ट्र सरकारसोबतचे हे सहकार्य आरोग्य क्षेत्रात नव्या सुधारणा घडवणारे ठरेल.

या उपक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांत उपचार सोडून देण्याचा धोका, उपचारातील अडथळे व मृत्यूची शक्यता उपचाराच्या सुरुवातीलाच ओळखण्यासाठी एआयआधारित प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च जोखमीच्या रुग्णांकडे वेळेत लक्ष देऊन योग्य उपचार करता येणार आहेत. ‘कफ अगेन्स्ट टीबी’ या एआयआधारित अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खोकल्याच्या आवाजाचे विश्लेषण करून क्षयरोगाची प्राथमिक ओळख आरोग्य संस्थांत जलदगतीने करता येणार आहे.

उपगाव पातळीवर क्षयरोगाचा धोका दर्शविणारे व्हल्नरेबिलिटी मॅपिंग तयार करण्यात येणार आहे. लोकसंख्या घनता, आरोग्य सुविधा, प्रदूषण, कुपोषण यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सक्रिय रुग्ण शोध (एसीएफ) मोहिमा अधिक परिणामकारक रीतीने राबवता येणार आहेत.
-----
एआयआधारित सपोर्ट सिस्टीम
राज्याच्या ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवेत एआयआधारित क्लिनिकल डीसिझन सपोर्ट सिस्टीम समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांना अचूक निदान व रुग्णांच्या तक्रारींचा संक्षिप्त आढावा घेणे सुलभ होणार आहे. मधुमेही रुग्णांसाठी ‘मधुनेत्रा’ या एआय प्रणालीद्वारे डोळ्यांच्या तपासणीस मदत होणार आहे. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे रुग्णांना पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT