मुंबई

नालासोपारा पश्चिमेला पाण्याच्या पाईप लाईनचे भूमिपूजन

CD

नालासोपारा पश्चिमेतील नळवाहिनीचे भूमिपूजन

विरार, ता. १६ (बातमीदार) : नालासोपारा पश्चिम येथील वांडा, चौकाळे, गोम्स आळी, रामबई आणि नवाळे गाव या परिसरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नळवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन रविवारी (ता. १५) गोम्स आळी येथील चर्चजवळ पार पडले.
बहुजन विकास आघाडीचे समर्थक असलेल्या स्टॅनी गोम्स यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, महापौर आजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या सहकार्याने तसेच वॉर्ड क्र. १३ मधील सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाचे काम सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने सर्व पश्चिम भागातील गावांमध्ये नळवाहिनी जोडणीच्या कामाला सुरुवात होईल. सदर कार्यक्रमासाठी उपमहापौर मार्शल लोपीस, नगरसेवक परेश किणी, नगरसेविका सॅरल डाबरे, नगरसेविका दीप्ती भोईर, जेष्ठ नागरिक सालू अल्मेडा, आग्नेलो गोम्स, राजू गोम्स, स्टॅनी गोम्स आणि सर्व युवा महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LLB Course: एलएलबी अभ्यासक्रम पाच वर्षांऐवजी चार वर्षांचा होणार? याचिकेवर सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार; सुनावणीची तारीख समोर

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

'दे धक्का' च्या शुटिंगवेळी मकरंद अनासपुरेंनी सिद्धार्थच्या जोरदार कानशिलात लागवलेली; स्वतः सांगितलं कारण

Latest Marathi Update : जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

Mumbai News: मानवी तस्करीची बळी ठरली, पण त्या बांगलादेशी महिलेचा जबाब का नोंदवला नाही? उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT