मुंबई

वल्केश राऊत यांना कनक कर्तव्य रत्न पुरस्कार

CD

वल्केश राऊत यांना कनक कर्तव्यरत्न पुरस्कार

पालघर, ता. १७ (बातमीदार) : क्रीडा क्षेत्रासह सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि उत्सव सेवा मंडळ अशा विविध क्षेत्रात सक्रिय असलेले वल्केश (आशीष) सीताराम राऊत यांना शैक्षणिक क्षेत्राच्या योगदानासाठी ‘कनक कर्तव्यरत्न’ पुरस्कार देण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील नरपड गावचे सुपुत्र असलेले वल्केश यांना नालंदा नृत्य संशोधन केंद्राचे संचालक राहुल रेळे व नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उमा रेळे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १३) मुंबईत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वाल्केश हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून मैदानी खेळ, भजन, गायन यात पारंगत आहेत. क्रिकेट, कबड्डी आणि कॅरम या खेळांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. क्रीडा क्षेत्राविषयी असलेल्या आवडीमुळे विविध क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. २०१४ पासून ते डहाणू तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, राज्य कबड्डी असोसिएशन सदस्य आहेत. डहाणू नरपडमधील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक संस्थेत खजिनदार म्हणून कार्यरत असून मुंबईची कारुळकर प्रतिष्ठान, सार्वजनिक उत्सव मंडळ नरपड येथे कार्यकारिणी सदस्य म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SRPF Bharti Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा? ८५ प्रश्न जसेच्या तसे सराव संचातून आल्याने खळबळ, भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह!

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Mahindra-PNB शेअर्स चर्चेत; कारण काय? बाजार आणखी कोसळणार?

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT