मुंबई

देसी जुगाडने गॅसटंचाईवर मात

CD

देशी जुगाडने गॅसटंचाईवर मात
टाकाऊ वस्तूच्या जळालेल्या इंधनावर शेगडी
भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १६ ः आखाती देशातील युद्धामुळे देशासह राज्यात गॅसटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गृहिनींना अडचणींना सामोरे झाले लागत आहे. अनेक उपाहारगृहे बंद पडू लागली असल्याने खोडाळा गावातील चंद्रकांत बारगजे यांनी देशी जुगाड लावत गाडीच्या जळालेल्या इंधनावर तयार केलेली शेगडी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
इराण-इस्राइल युद्धाची झळ भारताला सोसावी लागत आहे. या युद्धाचा परिणाम देशासह राज्यालाही जाणवू लागला आहे. राज्यात इंधन, गॅसटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गॅसची टाकी मिळविण्यासाठी रणरणत्या उन्हात रांगा लावल्या जात आहेत. गॅसटंचाईमुळे विविध व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावाचे चंद्रकांत बारगजे यांनी बुद्धी कौशल्याच्या जोरावर गाडीच्या जळालेल्या इंधनावरील शेगडीचा अनोखा प्रयोग चर्चेचा विषय बनला आहे.
--------------------------
अवघा तीन हजारांचा खर्च
वेल्डर असलेले चंद्रकांत बारगजे यांनी जळालेल्या गाडीच्या इंधनावर ज्वलनशील शेगडी तयार केली आहे. वेल्डिंगसाठीच्या टाकाऊ वस्तूचा वापर त्यांनी केला आहे. तसेच १,२०० रुपयांचा पंखा १२ व्होल्टेजची बॅटरी तसेच मजुरी असा तीन हजारांचा खर्च केला आहे. विशेष म्हणजे, ही शेगडी एक लिटर इंधनावर तीन ते चार तास चालते. त्यामुळे एका कुटुंबाचा स्वयंपाक केला जाऊ शकतो, असा दावा बारगजे यांनी केला आहे.
---------------------------
समाजमाध्यमातील व्हिडिओमधून शेगडी बनवण्याची प्रेरणा मिळाली. टाकाऊ वस्तूतून ही शेगडी बनवली आहे. गॅसटंचाईच्या काळात ही शेगडी गृहिणी तसेच हॉटेल व्यावसायायिकांसाठी उपयुक्त ठरणारी आहे.
- चंद्रकांत बारगजे, शेगडी निर्माता कारागीर, खोडाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT