मुंबई

२० ते २२ मार्च दरम्यान पर्वणी

CD

२० ते २२ मार्चदरम्यान पर्वणी
डहाणूतील पर्यटन महोत्सवासाठी प्रशासनाची तयारी
कासा, ता. १६ (बातमीदार) ः डहाणूतील पर्यटन महोत्सव-२०२६ च्या नियोजनासाठी प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. याच अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
डहाणू पारनाका येथील सी-व्ह्यू पार्क, आगर रोड येथे २० ते २२ मार्च २०२६ दरम्यान डहाणू पर्यटन महोत्सव होणार आहे. या निमित्ताने प्रशासन, विविध शासकीय विभाग तसेच स्थानिक संस्थांमध्ये समन्वय राहावा, या उद्देशाने गुरुवारी (ता. १२) बैठक घेण्यात आली. या बैठकीत महोत्सवाची सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा, पर्यटनस्थळाची सजावट तसेच पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विविध विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या काळात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्याची शक्यता असल्याने पोलिस, वन, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग, वीज वितरण संस्था तसेच इतर संबंधित विभागांनी समन्वयाचे निर्देश देण्यात आले.
--------------------------------------
पर्यटकांसाठीचे आकर्षण
- कृषी विभाग, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, बंदर अधिकारी, कस्टम विभाग, खादी, ग्रामोद्योग कार्यालय, महावितरण, भूमी अभिलेख, अदाणी इलेक्ट्रिसिटी, दुय्यम निबंधक कार्यालय आदी विभागांनाही महोत्सवाच्या नियोजनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- महोत्सवाच्या माध्यमातून डहाणूची पर्यटनस्थळे, स्थानिक संस्कृती, कला, हस्तकला, खाद्यसंस्कृती, समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य यांचा व्यापक प्रचार होऊन मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास प्रशासनाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : जळगावमधील साईबाबा मंदिरातील भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्यामुळे ७ कामगार जखमी

SCROLL FOR NEXT