हॉटेल व्यवसायाला घरघर
बोईसरमध्ये सिलिंडरच्या तुटवड्याने नुकसान
बोईसर, ता.१६ (वार्ताहर): आखाती देशांतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाला आहे. त्याचा परिणाम बोईसर, तारापूर एमआयडीसी परिसरातील हॉटेल्समध्ये पदार्थांची उपलब्धता मर्यादित झाली असून काही ठिकाणी व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे.
बोईसर परिसरात शंभरहून अधिक लहान-मोठी हॉटेल्स, धाबे तसेच ५८ परमिट रूम कार्यरत आहेत. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नाश्ता, स्नॅक्स, चायनीज पदार्थांची निर्मिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही व्यावसायिकांनी काही पदार्थ बंद केले असून, तर काहींनी संपूर्ण व्यवसायच थांबवला आहे. त्यामुळे तारापूर एमआयडीसी परिसरातील हजारो कामगारांच्या जेवणाची समस्या गंभीर झाली आहे. तर व्यवसायावर आलेल्या संकटामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जवळपास ५० टक्के रेस्टॉरंट बंद आहेत, तर उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
- रामानंद पुजारी, हॉटेल व्यवसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.