मुंबई

मुलुंड महोत्सव २०२६ चे आयोजन

CD

मुलुंड महोत्सव २०२६ चे आयोजन
मुलुंड, ता. १६ (बातमीदार) : मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे ‘मुलुंड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बुधवार (ता. १८) ते रविवार (ता. २२) मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता मुलुंड पूर्व येथील राजे संभाजी मैदानात होणार आहे.
या महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सवात हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, ‘खेळ पैठणीचा’, ‘रेडिओतील विश्व कसे असते’ हा विशेष कार्यक्रम, अभंग व नाट्यसंगीताचे सादरीकरण आदी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. यावर्षीच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईतील सर्वांत मोठी महारांगोळी, पोर्ट्रेट रांगोळी तसेच रांगोळीभोवती सादर होणारा नृत्याविष्कार असणार आहे. याच वेळी ‘मुलुंड सन्मान’ पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे. या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT