मुंबई

कोपरीत चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष

CD

कोपरीत चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष
भक्तांसाठी भक्ती-संगीत-परंपरेचा अनोखा संगम
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : ठाण्यातील कोपरी परिसरात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे यंदाचा चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात साजरा होणार आहे. भक्ती, परंपरा आणि मनोरंजन यांचा संगम घडवणारे अनेक दर्जेदार कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील कलाकारही उपस्थित राहणार आहेत.
धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे कोपरी येथे आयोजित केलेला चैत्र नवरात्रोत्सव यंदा मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उत्सवात स्वराज्याचे आख्यान, अभंग रिपोस्ट, माता की चौकीसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. याप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेविका मालती पाटील, नगरसेविका नम्रता पमनानी, नगरसेवक अनिल भोर, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, ऋषिकेश माने, संतोष बोडके, प्रकाश पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चैत्र नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कोपरी कॉलनी पूर्व येथील संत तुकाराम क्रीडांगण येथे या उत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. १८) सायंकाळी देवीचे आगमन होणार असून, १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी १२.१५ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाजत-गाजत देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. उत्सवाच्या काळात दररोज देवीचा मंगलाभिषेक, सप्तशती पाठ वाचन, सामूहिक देवी राजोपचार पूजन, देवी अर्चन, मध्यान आरती, सहस्रचंडी याग आणि सांज आरती असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने पार पडणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कलाकारांची हजेरी
कोपरी चैत्र नवरात्रोत्सवानिमित्ताने स्वराज्याचे आख्यान, अभंग रिपोस्ट, माता की चौकी यासह अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॅास फेम जान्हवी किल्लेकर, पुन्हा शिवाजीराजे भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बाल गायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर आदी नामवंत कलाकार या उत्सवाला हजेरी लावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

Pune Crime : नातीसोबत बसलेलो, शेजारच्या महिलेनं अफवा पसरवली; पर्वती प्रकरणातील आजोबाचं कोर्टात उत्तर, ३ दिवस पोलीस कोठडी

Theur Crime : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

SCROLL FOR NEXT