मुंबई

ठाण्यात नाशिकच्या गोदा आरतीची अनुभूती...

CD

ठाण्यात नाशिकच्या गोदा आरतीची अनुभूती
शिवरायांची कीर्तीचे भाषण, पारंपारिक पोवाडा, पारंपारिक वेशभूषा बनले उपक्रमाचे मुख्य आकर्षण
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीची अनुभूती ठाण्यात अनुभवण्यास मिळाली. या गोदा आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ठाणेकरांनी कचराळी तलाव येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक नारायण पवार, राजेश मोरे यांच्यासह इतर श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या माध्यमातून गेली २५ वर्षे गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गुढीपाडव्यानिमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.
यंदा श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने नाशिक येथील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीचे आयोजन केले होते. नाशिकमधील रामकुंड परिसरात होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठे आकर्षण असते. ज्या नागरिकांना नाशिक येथे जाऊन या आरतीचा अनुभव घेता आलेला नाही अशा नागरिकांसाठी ही अनोखी संधी होती. या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचे जतन करण्याचा संदेश दिला गेला.
या आरतीसाठी विशेषतः नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात आली होती. नाशिकमध्ये ज्या पद्धतीने गोदा आरती केली जाते, त्याच पद्धतीने ही गोदा आरती सायंकाळी ७ वाजता पाचपाखाडी येथील कचराळी तलाव परिसरात मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडली. या वेळी पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह आरती केली. तसेच भाविकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत या भक्तिमय वातावरणाचे अनुभूती घेतली. दरम्यान, एका शिवकन्यांनी शिवरायांबद्दलची माहिती इंग्रजी व मराठी भाषेत सर्व नागरिकांना सांगत शिवरायांचे कीर्तीबद्दल जागृत केले. तसेच यावेळी शिवरायांच्या पोवाड्यामुळे नागरिकांना एक वेगळाच आनंद अनुभवास मिळाला. यंदा या यात्रेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवावा व आपल्या पुरातन संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोचवण्याकरिता या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा आरतीचे आयोजन
आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा आरतीचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. ठाणेकरांना या धार्मिक परंपरेची ओळख व्हावी आणि कुंभमेळ्याबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT