मुंबई

४ कोटी २३ लाखांचा फटका

CD

कंत्राटदाराची चार कोटी २३ लाखांची फसवणूक
दिल्लीच्या कंपनीवर गुन्हा दाखल
उल्हासनगर ता. १६ (वार्ताहर) : शहरात सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी पाइप्स पुरवण्याच्या बहाण्याने एका स्थानिक कंत्राटदाराला तब्बल चार कोटी २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका ट्रेडिंग कंपनीच्या तीन मालकांविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकी अशोकलाल खुबचंदानी या कंत्राटदाराकडे ‘अमृत’ योजनेअंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम आहे. जून २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत दिल्ली स्थित ‘एच.सी. पाइप्स प्रा. लि.’ व ‘एच.सी. पाइप्स अँड वॉल्स’ या कंपन्यांच्या मालकांनी खुबचंदानी यांच्याशी संपर्क साधला. आपले डी-आय व एमएस पाइप्स दर्जेदार असून, वेळेत पुरवठा करू, असे प्रलोभन त्यांनी दाखवले. सुरुवातीला काही ऑर्डर्स वेळेवर पाठवून आरोपींनी कंत्राटदाराचा विश्वास संपादन केला.

सरकारी काम वेळेत पूर्ण करण्याच्या घाईत असलेल्या कंत्राटदाराकडून आरोपींनी एकूण ४,२३,८३,३४३ रुपये ॲडव्हान्स स्वरूपात उकळले. मात्र, इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही पाइप्सचा पुरवठा न करता टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खुबचंदानी यांनी पोलिसांत धाव घेतली. विकास प्रवीणकुमार जैन, अंकुर प्रवीणकुमार जैन, आस्था जैन असे गुन्हा दाखल झालेले आरोपी आहेत. सरकारी योजनेच्या कामात अडथळा निर्माण करून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या या आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे उल्हासनगरमधील कंत्राटदार वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मध्यवर्ती पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT