मुंबई

ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

CD

ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ
दोन घटनांमध्ये ४.१० लाखांचे दागिने लंपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याचे प्रकार समोर आले आहेत. या घटनांत मिळून सुमारे चार लाख १० हजार रुपयांच्या दागिन्यांचा ऐवज लंपास झाला आहे.
भिवंडी येथील शोभा उर्फ सविता पाटील या रविवारी (ता. १५) रात्री दुचाकीवरून वर्तकनगरकडे जात होत्या. नाशिक-मुंबई महामार्गावरील रुस्तमजी इमारतीसमोर दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून त्यांच्या दुचाकीजवळ आले व गाडी अडवून पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून पळ काढला. या घटनेत १.२० लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार महिलेच्या मुलाने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पसार झाले.
तर, दुसरी घटना घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात घडली. बोरिवली येथील गायत्री कृष्णा सेल्वराज (वय २९) या कुटुंबासह शिर्डी येथून मुंबईकडे परतत होत्या. रविवारी (ता. १५) पहाटे गायमुख बसस्टॉपजवळील हनुमान मंदिराजवळ त्यांची मुलीला उलटी होत असल्याने कार थांबली असता पायी चालत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि चेन जबरदस्तीने खेचून पळ काढला. या घटनेत दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र आणि ९० हजार रुपयांची चेन, असा २.९० लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT