मुंबई

मद्यधुंद १७७ चालकांवर कारवाई

CD

उल्हासनगर, ता. १६ (बातमीदार) : दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर उल्हासनगर व विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाने कडक कारवाई करत राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण १७७ जणांकडून प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे १७ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे अनेकांना चांगलेच महागात पडले.
पोलिस हवालदार विष्णू मोगरे, नाना आव्हाड, भारत खाडेकर, वॉर्डन राहुल ससाणे यांनी ८८ तळीरामांविरुद्ध ई-दावे दाखल केले होते. या सर्वांकडून प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाकडून वरिष्ठ निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक योगेश कढणे व माळी यांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २४३ ई-चलन प्रकरणांची निर्गती केली. या कारवाईत एकूण १० लाख ५७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ८९ जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडूनही प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दारू पिऊन वाहन चालवू नये याबाबत जनजागृती केली जात असतानाही काही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. परिणामी, त्याची किंमत १० हजार रुपयांच्या दंडाच्या रूपाने मोजावी लागते, असा इशाराही वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT