मुंबई

एका दिवसात ८१५ ई-चलन प्रकरणांची निर्गती

CD

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करताना उल्हासनगर वाहतूक विभागाने राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. एका दिवसात तब्बल ८१५ ई-चलन प्रकरणांची निर्गती करत १३ लाख ६० हजार ९०० रुपयांचा दंड सरकारकडे जमा केला आहे. यातून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाचा कठोर संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये शनिवारी (ता. १४) उल्हासनगर वाहतूक उपविभागाकडून दाखल झालेल्या ८१५ ई-चलन प्रकरणांची सुनावणी करून त्यांची निर्गती करण्यात आली. या कारवाईतून एकूण १३ लाख ६० हजार ९०० रुपयांची दंड रक्कम सरकारच्या खात्यात जमा झाली आहे. ही कारवाई उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल केलेल्या प्रकरणांचा निपटारा लोक अदालतच्या माध्यमातून केल्याने न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होण्यास मदत झाली. या मोहिमेत हवालदार विष्णू मोगरे, नाना आव्हाड, भारत खाडेकर; वाहतूक वॉर्डन राहुल ससाणे यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई प्रभावीपणे पार पाडली. संबंधित अधिकाऱ्यांनी ई-चलनद्वारे नोंदवलेल्या प्रकरणांची तपासणी करून वाहनचालकांकडून दंड वसूल करत प्रकरणांची निर्गती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT