मुंबई

दृष्टी नसली तरी जिद्दीचा प्रकाश

CD

दृष्टी नसली तरी जिद्दीचा प्रकाश
माणगाव, ता. १६ (वार्ताहर) : माणगाव येथील उज्वला टायपिंग संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जीसीसी-टीबीसी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या जानेवारी २०२६ मधील इंग्रजी व मराठी टायपिंग परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. या परीक्षेचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाला.
या यशामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी दृष्टिहीन विद्यार्थी धृव विलास महाडिक व हर्ष विलास महाडिक यांनी केली. दोघेही १०० टक्के दृष्टिहीन असूनही त्यांनी परिश्रमपूर्वक टायपिंगचे प्रशिक्षण घेत उत्कृष्ट गुण मिळवले. मराठी टायपिंगमध्ये धृव महाडिक याने ८९.५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
इंग्रजी विषयात कोदे सोनाली मनोहर हिने ९५.५ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. जाधव मानसी बाळ (८७.५) व तेटगुरे स्वरा राकेश (८७) यांनीही चांगली कामगिरी केली. तसेच मराठी विषयात जाधव प्रियंका बुद्धेश (८८) व कोदे सोनाली मनोहर (८७.५) यांनीही यश मिळवले.
या यशाबद्दल संस्थेच्या प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून, दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा... स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणते-

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

Oscars 2026 Goodie Bag: बाबो! ऑस्कर जिंकलं नाही तरी नॉमिनींना मिळाली 3.23 कोटींची बॅग, आत नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT