उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : काही महिन्यांपासून परिसरात सुरू असलेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या मालिकांना अखेर ब्रेक लागला आहे. उल्हासनगर गुन्हे शाखा घटक ४च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने दोन सराईत आरोपींना अटक करत घरफोडी व वाहनचोरीच्या १० गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लक्कीसिंग गब्बरसिंग टाक आणि कृष्णा शंकर शर्मा या दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व-पश्चिम आणि अंबरनाथ पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी घरफोडी करून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, अटक आरोपी लक्कीसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर आणि कर्नाटक राज्यात यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.