मुंबई

कल्याणमध्ये घुमणार भारतीय संस्कृतीचा हुंकार

CD

कल्याणमध्ये घुमणार भारतीय संस्कृतीचा हुंकार
‘अनेकता में एकता’ संकल्पनेवर गुढीपाडवा स्वागतयात्रा

कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : मराठी नववर्षाचे स्वागत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी कल्याण नगरी सज्ज झाली आहे. येत्या चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच १९ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण ‘अनेकता में एकता’ (विविधतेत एकता) ही संकल्पना असणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील संस्कृतींचे दर्शन घडवणारी ही स्वागतयात्रा कल्याणकरांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.

भारतातील विविध राज्ये, तिथल्या भाषा, पेहराव आणि लोककला ही आपली खरी श्रीमंती आहे. हीच श्रीमंती एका सूत्रात गुंफण्यासाठी यंदा महाराष्ट्राच्या लेझीम आणि ढोल-ताशा पथकांसोबतच इतर राज्यांतील पारंपरिक लोकनृत्ये आणि चित्ररथांचा समावेश असेल. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सोहळ्यास महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर अ‍ॅड. हर्षाली चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. आपली संस्कृती, आपला अभिमान हा विचार जपत जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब या सोहळ्यात सहभागी व्हावे. यानिमित्ताने केवळ नववर्षाचे स्वागतच नाही, तर देशातील विविधतेचा उत्सव आपण एकत्र साजरा करू या, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

स्वागतयात्रेचे स्वरूप
१९ मार्चला सकाळी सूर्योदयाच्या सुमारास पारंपरिक पूजा आणि गुढीपूजनाने यात्रेला सुरुवात होईल. भगवे ध्वज, आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीने कल्याण शहर न्हाऊन निघणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. स्वागतयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी विविध प्रांतांतील संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलामंच उभारले जाणार आहेत.

आयोजक व निमंत्रक
कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सचिव अमोल जोशी, कोषाध्यक्ष दीपक चौधरी, सदस्य अ‍ॅड. निखिल बुधकर, जैन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयंतीलाल कोठारी, सचिव धरणेंद्र मेहता आणि नववर्ष स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष मदन शंकळेशा यांनी सर्व नागरिकांना या यात्रेत सहभागी होण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LLB Course: एलएलबी अभ्यासक्रम पाच वर्षांऐवजी चार वर्षांचा होणार? याचिकेवर सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार; सुनावणीची तारीख समोर

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

'दे धक्का' च्या शुटिंगवेळी मकरंद अनासपुरेंनी सिद्धार्थच्या जोरदार कानशिलात लागवलेली; स्वतः सांगितलं कारण

Latest Marathi Update : जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

Mumbai News: मानवी तस्करीची बळी ठरली, पण त्या बांगलादेशी महिलेचा जबाब का नोंदवला नाही? उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT