मुंबई

सुपोषित ग्रामपंचायत अभियानात वाकण ग्रामपंचायतीची निवड

CD

सुपोषित ग्रामपंचायत अभियानात वाकण ग्रामपंचायतीची निवड
पोलादपूर, ता.१६ (बातमीदार) : पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायतीची ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ अंतर्गत देशभरातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून निवड झाली आहे. या अभियानांतर्गत देशातील सुमारे एक हजार ग्रामपंचायतींची निवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
या निवडीसाठी मागील वर्षभरातील ‘पोषण ट्रॅकर’ ॲपवरील माहितीचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर त्रयस्थ यंत्रणेमार्फत संबंधित ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर वाकण ग्रामपंचायतीची निवड निश्चित करण्यात आली.
ही निवड पोलादपूर तालुक्यासाठी अभिमानास्पद मानली जात आहे. ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाल्याचे सांगण्यात आले.
या निवडीमुळे गावातील पोषणविषयक उपक्रमांना अधिक चालना मिळणार असून माता व बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी पुढील काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दरम्यान, पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी अंगणवाडी सेविका व ग्रामसेविकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT