मुंबई

ठाणे महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांना मुदतवाढ

CD

ठाणे पालिकेचा घनकचरा प्रकल्पांना बूस्टर डोस
१.१८ कोटींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव
ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेल्या विविध घनकचरा प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बायोमिथेननायझेशन, बायो कंपोस्टिंग आणि मॅकेनिकल कंपोस्टिंग प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे एक कोटी १८ लाख रुपयांहून अधिक खर्चाचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात एक ते पाच टन क्षमतेचे बायोमिथेननायझेशन, बायो कंपोस्टिंग आणि मॅकेनिकल कंपोस्टिंग प्रकल्प ई-टेंडर प्रक्रियेद्वारे उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांची उभारणी, परिचालन, निगा व देखभाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आली होती. संबंधित निविदांना २०१७ व २०१८मध्ये आयुक्त तसेच महासभेची मान्यता मिळाली होती. यातील काही प्रकल्पांच्या कराराची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. नवीन निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे, मात्र ती पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असल्याने शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी विद्यमान कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पांचा खर्च ‘घनकचरा प्रकल्पाची निगा व देखभाल’ या लेखाशीर्षातून केला जातो. मात्र सध्या या खात्यात पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ७२ (ब)अंतर्गत महासभेची विशेष मान्यता घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

तात्पुरती मुदतवाढ
घनकचऱ्याचे व्यवस्थापन सुरळीत सुरू राहण्यासाठी या प्रकल्पांचे परिचालन अखंडित ठेवणे आवश्यक असल्याने नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरती मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


प्रकल्पाचा प्रकार कंत्राटदार संस्था अपेक्षित खर्च (३ महिने)
बायोमिथेननायझेशन (हिरानंदानी) मे. एनप्रोटेक सोल्युशन्स ₹ ८,४४,२००
बायो कंपोस्टिंग प्रकल्प मे. अमृत एंटरप्रायझेस ₹ ५२,९२,०००
मॅकेनिकल कंपोस्टिंग प्रकल्प मे. अमृत एंटरप्रायझेस व मे. अर्थकेअर इक्वीपमेंट ₹ ५६,७७,६०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT