मुंबई

श्रीवर्धनमध्ये लोकन्यायालयात ७८९ प्रकरणे निकाली

CD

श्रीवर्धनमध्ये लोकन्यायालयात ७८९ प्रकरणे निकाली
श्रीवर्धन, ता.१६ (वार्ताहर) : श्रीवर्धन न्यायालयात शनिवारी (ता.१४) न्यायाधीश समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात एकूण ७८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या १९५ प्रकरणांपैकी ४३, तर वादपूर्व १३४१ प्रकरणांपैकी ७४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रक्रियेत एकूण १६ लाख ५५ हजार १८४ रुपयांची वसुली करण्यात आली. दखलपात्र गुन्ह्यांची ४१ प्रकरणे तसेच धनादेश अनादराची २ प्रकरणे निकाली काढण्यात आली. वादपूर्व प्रकरणांमध्ये बँक रिकव्हरीची १७ तर इतर ६०७ प्रकरणे निकाली निघाली.
या लोकन्यायालयाच्या आयोजनात वकील संघटनेचे ज्येष्ठ विधीज्ञ राजेश वावेकर, शैलेश चांदोरकर, पूजा दुर्गावले तसेच इतर वकीलवर्ग आणि न्यायालयीन कर्मचारी जयेश गुरव व सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकन्यायालयामुळे जनतेमध्ये जागृती होऊन अनेक वर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरत असल्याचे मत न्यायाधीश समीर शेख यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

SCROLL FOR NEXT