मुंबई

पामबीच हिट-अँड-रन: सानपाडा पोलिसांनी कारचा लावला शोध

CD

पाम बीच हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा

सानपाडा पोलिसांनी घेतला कारचा शोध

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : पाम बीच मार्गावर सानपाडा येथे ३ मार्च रोजी पहाटे झालेल्या भीषण हिट अँड रन प्रकरणाचा सानपाडा पोलिसांनी उलगडा केला आहे. या अपघातात प्रशांत जमदाडे (२३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्याच्यासोबत असलेली १७ वर्षीय हरमन कौर ही गंभीर जखमी झाली असून, सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन कारचा शोध घेत चालकांची ओळख पटवली आहे.

कोपरखैरणे येथील प्रशांत जमदाडे हा आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून पाम बीच मार्गाने घरी जात होता. पहाटे सुमारे ३ वाजता सारसोळे जंक्शन आणि मोराज सर्कलदरम्यान त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन दोघे रस्त्यावर पडले. त्याच वेळी मागून येणाऱ्या दोन कार त्यांच्या अंगावरून गेल्याने भीषण अपघात झाला. प्रशांतचे शीर धडावेगळे झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर हरमन गंभीर जखमी झाली. दरम्यान, हरमन कौर नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

अपघातस्थळी सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी जवळील परिसरातील फुटेज तपासून संशयित वाहनांचा मागोवा घेतला. तपासात कारचालक सागर सांडा (२३) आणि कारचालक कृष्णा रावरिया (२०) यांची ओळख पटली. दोघेही घणसोलीचे रहिवासी असून, त्यांच्या कार ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT