मुंबई

पनवेल परिसरात गढूळ पाणीपुरवठा

CD

पनवेल, ता. १६ (बातमीदार) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या नवीन जलवाहिनी जोडणीच्या कामानंतर पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडे आणि विचुंबे परिसरात गढूळ व लालसर पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. नळ सुरू होताच स्वच्छ पाण्याऐवजी मातीमिश्रित पाणी येत असल्याने सिडको वसाहतींतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन जलवाहिन्यांची जोडणी तसेच इतर दुरुस्तीच्या कामांसाठी १२ मार्चला पाणीपुरवठा बंद ठेवला होता. नियोजनानुसार हा कालावधी ३६ तासांचा असला तरी अनेक भागांत जवळपास ४८ तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा ठप्प राहिला. त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र नळातून येणारे पाणी गढूळ व लालसर असल्याचे आढळून आले. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती व गाळ मिसळलेला असल्यामुळे ते पिण्यासाठीच नव्हे तर घरगुती वापरासाठीही अयोग्य ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टाकी रिकामी करण्याची वेळ
अनेक घरांमध्ये नळातून आलेले पाणी बादल्यांमध्ये साठवून ठेवल्यानंतर तळाशी लालसर गाळाचा थर दिसून आला. काही सोसायट्यांमध्ये तर जलसाठवण टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचल्यामुळे टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून पुन्हा स्वच्छ करण्याची वेळ आली.

बाटलीबंद कॅनचा आधार
सिडको वसाहतींमध्ये ही समस्या अधिक गंभीर असल्याचे दिसून आले. पिण्यायोग्य पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांना पाण्याचे बाटलीबंद कॅन विकत घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागला. काही नागरिकांनी तळोजा एमआयडीसी परिसरातून पाणी आणण्याची व्यवस्था केली.

सिडको कार्यालयात धाव
कळंबोली परिसरातील काही महिलांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. नळातून येणारे गढूळ पाणी वापरायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करीत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT