मुंबई

आसोळे येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

CD

मुरबाड, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यातील आसोळे येथील हायस्कूलमध्ये ३०० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आयकेएस केअर फाउंडेशन आणि आसोळे विभाग हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम शनिवारी (ता. १४) राबवण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन माजी सरपंच तसेच हायस्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष शंकर मारुती कौर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात आसोळे, करवळे, वाघिवली, वांजळे, किशोर, पोटगाव, बरडपाडा, असोसे आणि वडू या दुर्गम भागातील गावांमधून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. फौजीया शेख आणि डॉ. मयुरी पोतदार यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच रक्त तपासणीसाठी ऋतुजा आगीवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळले, त्या विद्यार्थ्यांना मोफत औषधे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT