मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील चिंचवली गावात भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या वतीने महिला सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात चिंचवली गावातील अंगणवाडीसेविकांचा सन्मान करण्यात आला. तसेच बचत गटाच्या सीआरपी आणि आशा कार्यकर्त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सन्मानित महिलांनी भरत दळवी युवा विकास मंचाच्या उपक्रमाबद्दल आभार मानले. कार्यक्रमामुळे महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.