मुंबई

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाचा दिलासा

CD

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाचा दिलासा
डीपफेक फोटो, व्हिडिओ प्रतिवाद्यांना तत्काळ हटविण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजक राज कुंद्रा यांना लक्ष्य करून तयार केलेले ‘एआय’ निर्मित डीपफेक फोटो अथवा व्हिडिओ तत्काळ काढून टाकण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने संबंधित संकेतस्थळांना दिले.

शेट्टीच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाले असून, त्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नुकतेच न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने नोंदवले आणि सुमारे २८ विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (प्रतिवादींना) सर्व अश्लील सामग्री त्यांच्या संकेतस्थळावरून आठ दिवसांत काढून टाकण्याचे आदेश दिले. रेकॉर्डवरील माहितीवरून प्रथमदर्शनी शिल्पा शेट्टीचे व्यक्तिमत्त्व, नाव, फोटो, व्हिडिओ इत्यादीचा गैरवापर करण्यात आला आहे. एआय कंटेंट तयार करणाऱ्या वेबसाइट्स, डीपफेक आणि इतर एआयनिर्मित अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करून संकेतस्थळावर टाकण्यात आले. त्यामुळे शेट्टीच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन झाले असून, तिच्या संमतीशिवाय तिच्या फोटोचा वापर केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेले डीपफेक आणि एआयनिर्मित अश्लील फोटो आणि व्हिडिओ हे सर्वात त्रासदायक आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिमा मलिन होते. भारतीय संविधानाच्या कलम २१अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराचे आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते, असेही निरीक्षण न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दिलासा देताना नोंदवले.

.....
संमतीशिवाय व्यावसायिक शोषण
एखाद्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्तीच्या संमतीशिवाय व्यावसायिक शोषण करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तसेच व्यावसायिक फायद्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची अनधिकृतपणे शोषण करणारी सामग्री अपलोड करणे याचे कोणतेही समर्थन असू शकत नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT