मुंबई

लखलखणारे दिवे बसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

CD

लखलखणारे दिवे बसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
महापौर रितू तावडे यांचा इशारा
मुंबई, ता. १६ ः पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर लखलखणारे दिवे बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. दिवे बसवा, अशी प्रशासनाकडे कुठलीही मागणी केलेली नव्हती, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.
लाल दिवा, वेणी-फणी याशिवाय विरोधकांकडे प्रश्नच नाही, असे विरोधकांच्या आरोपांना उत्तर त्यांनी दिले आहे. पत्रकार परिषदेत महापौरांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. गॅस सिलिंडरचा तुटवडा नसला तरी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट याबाबत अफवा पसरवतात, असा आरोप महापौर तावडे यांनी केला. त्या म्हणाल्या की, महापौरपदाची जबाबदार स्वीकारल्यानंतर पालिका प्रशासनाकडून ज्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या, त्या मान्य केल्या, परंतु महापौरांना लाल दिवा आवडतो, असा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांच्या गाडीवर लाल दिवा बसवावा, यासाठी मागणी केली होती, याचा व्हिडिओ दाखवत सभागृहनेते गणेश खणकर यांनी टीका केली.
मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून लोकांची कामे होत आहेत. दररोज ३०० ते ४०० लोक भेटायला येतात. त्यामुळे महापौर कार्यालयात गर्दी वाढत असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी, असे पत्र आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT