मुंबई

कोणताही न्यूनगंड प्रगतीच्या वाटेत आड येत नाही - भारत गणेशपुरे

CD

कोणताही न्यूनगंड प्रगतीच्या वाटेत आड येत नाही : भारत गणेशपुरे
कल्याण सार्वजनिक वाचनालयात जागतिक महिला दिन उत्साहात

कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : ‘‘दैनंदिन जीवनाच्या धावपळीतून स्त्रियांनी स्वतःची आवड जपण्यासाठी वेळ काढला पाहिजे. छोट्या गोष्टींतून आनंद लुटा, स्वतःची मते ठामपणे मांडा आणि व्यक्त व्हा. कोणताही न्यूनगंड प्रगतीच्या वाटेत आड येत नाही,’’ असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी महिलांना दिला.

सार्वजनिक वाचनालय, कल्याणतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळा व ‘मुक्तपणे व्यक्त व्हा’ या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना सांगितले की, वाचनालयाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस निलिमा नरेगलकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य मुग्धा घाटे, अरविंद शिंपी, प्रा. उदय सामंत आणि ग्रंथसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमिता कुकडे यांनी केले.

‘मुक्तपणे व्यक्त व्हा’ स्पर्धेचा निकाल
स्त्रीशक्तीच्या सन्मानार्थ वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजिकांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये संगीता बारस्कर, ॲड. मंगला कांगणे, अंजली पाठक, अलका देशपांडे, वीणा पाटील यांचा सन्मान केला आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ‘मुक्तपणे व्यक्त व्हा’ या स्पर्धेत सायली महाजन यांनी प्रथम, मुक्ता राजवाडे यांनी द्वितीय, तर नेहा भागवत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वंदना कदम आणि शैला जोशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT