मुंबई

केडीएमसी महासभेत गाजला सुरक्षेचा मुद्दा

CD

विषय समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती
महासभेत पोलिस बंदोबस्तावरून रणकंदन
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सोमवारी (ता. १६) पार पडलेल्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. महापौर हर्षाली चौधरी यांनी गटनेत्यांकडून आलेल्या नावांची घोषणा केली. मात्र, याच वेळी महापालिकेला आलेल्या पोलिस छावणीच्या स्वरूपावरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

महासभेनिमित्त मुख्यालयात तैनात असलेल्या पोलिसांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला. ‘‘आम्ही काय चोर-गुंड आहोत का,’’ असा संतप्त सवाल शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी उपस्थित केला. महिला नगरसेविकांच्या पर्सचीही तपासणी केल्याने त्यांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

समित्यांचे बलाबल आणि प्रमुख नियुक्त्या
महासभेत पीठासीन अधिकारी महापौर हर्षाली चौधरी यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली. सभागृह नेतेपदी भाजपचे वरूण पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.

१. स्थायी समिती (१६ सदस्य) :
शिव-आघाडी (शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी) : आठ सदस्य (गजानन पाटील, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे, महेश गायकवाड, गणेश लांडगे).
भाजप : सात सदस्य (दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेडणेकर, नंदू म्हात्रे, उपेक्षा भोईर).
शिवसेना (ठाकरे गट) : एक सदस्य (विशाल गारवे).

२. महिला व बालकल्याण समिती (११ सदस्य):
शिव-आघाडी पाच, भाजप पाच आणि ठाकरे गट एक अशा पद्धतीने विभागणी करण्यात आली. यामध्ये रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, मेघाली खेमा, तेजस्वी गायकवाड आदींचा समावेश आहे.
३. शिक्षण समिती (११ सदस्य) : प्रतीक पेणकर, अभिजित थरवळ, प्रल्हाद म्हात्रे, अपर्णा भोईर यांच्यासह इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

गुणवंतांचा गौरव
यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या शिवम वखरे, प्रणव बेंढारी आणि पारस मेस्त्री या तरुणांचा, तसेच अपंग विकास महासंघाचे अशोक भोईर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उत्सुकता सभापतिपदाची
समित्यांच्या सदस्यांची निवड पूर्ण झाल्याने आता ‘तिजोरीची चावी’ मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

जुळून येती रेशीमगाठीनंतर पहिल्यांदा झी मराठीवर दिसणार ललित प्रभाकर, 'या' मालिकेत पहायला मिळणार

Navi Mumbai: मुक्या जीवांना हक्काच्या उपचारांची सुविधा मिळणार, नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू होणार; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT