मुंबई

झुनोटिक रोगांविरोधात ‘वन हेल्थ’चा संदेश

CD

झुनोटिक रोगांविरोधात ‘वन हेल्थ’चा संदेश
आंबिवलीत पशुपालकांसाठी जागरूकता शिबिर
टिटवाळा, ता. १७ (वार्ताहर) : प्राण्यांपासून मानवांना होणाऱ्या संसर्गजन्य (झुनोटिक) रोगांबाबत ग्रामीण भागातील पशुपालक आणि नागरिकांना सजग करण्यासाठी आंबिवली येथे विशेष जागरूकता कार्यक्रम पार पडला. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘समता नगर’ येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ‘वन हेल्थ’ प्रकल्पांतर्गत राबवण्यात आलेल्या या शिबिरात ४५ पशुपालक व शेतकरी सहभागी झाले होते. यापैकी २६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘स्वच्छता किट’चे वाटप करण्यात आले. प्रकल्प प्रमुख डॉ. विलास वैद्य यांनी रेबीज, लेप्टोस्पायरोसिस, क्षयरोग, ब्रुसेलोसिस आणि अँथ्रॅक्स यांसारख्या गंभीर आजारांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त डॉ. दीपक कंधारे होते. तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर कसबे, डॉ. प्रीती म्हात्रे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी सुरोषे यांनी उपस्थितांना शासकीय योजनांची माहिती दिली. हा उपक्रम मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले व डॉ. रवींद्र झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला.

संसर्ग कसा होतो?
दूषित पाणी, अन्न, प्राण्यांचा थेट संपर्क आणि त्यांच्या स्रावाद्वारे हे रोग पसरतात.

प्रतिबंधात्मक उपाय :
प्राण्यांच्या संपर्कानंतर साबणाने हात धुणे, हातमोजे व गमबूटचा वापर करणे आणि जखमांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

‘वन हेल्थ’ संकल्पना
सह-अन्वेषक डॉ. जगदीश गुडेवार यांनी मानव, प्राणी आणि पर्यावरण या तिन्ही घटकांच्या आरोग्याचा परस्परसंबंध स्पष्ट केला. प्राण्यांच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, पूर्ण शिजवलेले मांस व पाश्चराइज्ड दुधाचे सेवन करणे आणि स्वच्छ निवारा राखणे यातून रोगांचा प्रसार रोखता येतो, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT