जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योगांना संधी
एनकेसीसीए व डीजीएफटी यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर चर्चासत्र
वाणगाव, ता. १७ (बातमीदार) : नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चर यांच्या वतीने तसेच डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्या सहकार्याने ‘अनलॉकिंग ग्लोबल मार्केट : फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आणि डीजीएफटी स्कीम्स’ या विषयावर बुधवारी (ता. १८) दुपारी २:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत फ्रेंड्स बँक्वेट हॉल, बोरिवली पश्चिम, मुंबई येथे मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम विशेषतः उद्योगपती, उत्पादक, निर्यातदार, मर्चंट एक्सपोर्टस, स्टार्टअप्स, शेतकरी तसेच निर्यात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी नोंदणी शुल्क नसणार आहे. या चर्चासत्राचा लाभ जास्तीत जास्त उद्योजक व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन एनकेसीसीएचे अध्यक्ष निमिष सावे यांनी केले आहे. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा भविष्यातील विकास आणि आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारतातील उद्योग, व्यापार आणि निर्यात क्षेत्राला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र आणि उत्तर कोकण हा प्रदेश उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स तसेच कृषी आणि कृषी-आधारित उद्योगांसाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चर या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे उत्तर कोकण भागातील उद्योगपती, उद्योजक, व्यापारी, स्टार्टअप्स तसेच शेतकरी आणि कृषी उत्पादकांना जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या उत्पादनांना निर्यातीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देणे असणार आहे.
या चर्चासत्रात फ्री ट्रेड अॅग्रीमेंट्स तसेच डीजीएफटीच्या विविध निर्यात प्रोत्साहन योजना याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यामुळे भारतीय उद्योग व कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश कसा मिळवता येईल, सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि निर्यात व्यवसाय कसा वाढवता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. अशा प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रम उद्योजक आणि शेतकरी यांना नवीन बाजारपेठा, निर्यात धोरणे आणि सरकारी योजना यांची माहिती देऊन उद्योग व कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.