खासदारांच्या हस्ते ओझोन रुग्णालयाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन
पालघर, ता. १७ (बातमीदार) : चिंतुपाडा रोड येथील ओझोन हायटेक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पालघर शहरातील वैद्यकीय उपचारासाठी सुसज्ज व अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज अशा ओझोन रुग्णालयाची स्थापना २० फेब्रुवारी २०२५ रोजी झाली होती. या रुग्णालयाला रुग्णांची सेवेत करताना एक वर्ष झाले आहे. हृदयाच्या अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी चाचणीसाठी येथे प्रयोगशाळेची गरज लक्षात घेता नवीन व अत्याधुनिक यंत्रसामग्रीयुक्त कॅथलॅब (प्रयोगशाळा)ची निर्मिती येथे करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी खासदार डॉ. सवरा, प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. नवीन अग्रवाल, डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. उज्वला काळे, कैलास म्हात्रे, अशोक अंबुरे आणि अरुण माने आदी मान्यवर उपस्थित होते. ओझोन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने डॉ. अतुल पारसकर, डॉ. राज हंबर्डे, डॉ. गणेश शिरोडकर, डॉ. अमित यादव, डॉ. श्याम पारसकर यांनी ओझोन रुग्णालयातील अद्ययावत वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.