पालघरमध्ये ‘मिशन लक्षवेध’अंतर्गत क्रीडा प्रशिक्षण केंद्र
पालघर, ता. १७ (बातमीदार) : राज्यातील क्रीडा विकासासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात क्रीडा निपुणता प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी इच्छुक व गुणवंत खेळाडूंनी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत खेळाडूंच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार असून क्रीडा प्रशिक्षण, स्पर्धा, क्रीडा वैद्यकीय सुविधा, करिअर मार्गदर्शन अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पालघर जिल्ह्यात ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, शूटिंग, बॅडमिंटन आणि आर्चरी या खेळांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची चाचणीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या निवड चाचण्या ७ आणि ८ एप्रिलला विविध ठिकाणी होणार आहेत. ॲथलेटिक्ससाठी कोळगाव येथील पोलिस परेड मैदान, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि आर्चरीसाठी जिल्हा क्रीडा संकुल, पालघर तर शूटिंगसाठी विरार येथे चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत.
निवड झालेल्या खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, गणवेश, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, फिजिओथेरपी, पोषण सल्ला, वैद्यकीय तपासणी तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय खेळाडूंना भोजन व पूरक आहाराची सुविधाही देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले खेळाडू पात्र ठरणार आहेत.
अर्ज करताना जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, बोनाफाईड आणि पालक संमतीपत्र अशी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जदारांनी ऑनलाइन अर्जासोबत गुगल फॉर्मदेखील भरावा. तसेच निवड चाचणीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांच्या प्रती आणि तीन पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.