मुंबई

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार

CD

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा होणार नागरी सत्कार
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महासभेत ठराव मंजूर

डोंबिवली, ता. १७ ः कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा धडाका आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मिळवून दिलेली गती, याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. १६) झालेल्या महासभेत यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

गेल्या काही वर्षांत मतदारसंघात मेट्रो, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, रिंग रोड आणि विविध उड्डाणपूल यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना खासदार शिंदे यांनी गती मिळवून दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याची भावना नगरसेवकांनी महासभेत व्यक्त केली.

सभागृहात उमटले पडसाद
शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे आणि उपमहापौर राहुल दामले यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेना नगरसेवक सचिन पोटे, अस्मिता मोरे, माया कांबळे तसेच भाजपचे सभागृह नेते वरुण पाटील, मंदार हळबे, दीपेश म्हात्रे आणि दया गायकवाड यांनी पाठिंबा दिला. कल्याण पूर्वेचे वरिष्ठ नगरसेवक नीलेश शिंदे यांनी खासदार शिंदे यांचा नागरी सत्कार करण्याची सूचना मांडली, ज्याला सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात संमती दिली.

महापौरांची घोषणा
महापौर ॲड. हर्षाली थविल-चौधरी यांनी या सूचनेचे स्वागत करत नागरी सत्काराचा ठराव अधिकृतरीत्या मंजूर केला. लवकरच एका विशेष सोहळ्यात महापालिकेतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गौरव करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT