विद्युत धक्क्याने सात वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
डोंबिवलीतील जिजाईनगर-गोग्रासवाडी परिसरात शोककळा
डोंबिवली, ता. १७ : गोग्रासवाडी परिसरात रविवारी (ता. १५) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. इमारतीमागे खेळत असताना महावितरणच्या इलेक्ट्रिक फिडर पिलरला स्पर्श झाल्याने कृष्णा संजय यादव (सात वर्षे नऊ महिने) या चिमुरड्याचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत यंत्रणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिजाईनगरातील विठ्ठल कृपा इमारतीत राहणारा कृष्णा रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत खेळत होता. खेळताना त्याचा चेंडू इमारतीमागील मोकळ्या जागेत असलेल्या विजेच्या खांबाजवळ गेला. तो चेंडू उचलण्यासाठी गेला असता, त्याचा हात खांबाला लागला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला. नागरिकांनी कृष्णाला तातडीने स्टार कॉलनी येथील एसीई रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वडील संजय मेवालाल यादव यांच्या जबानीनुसार, टिळकनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नाही, असे यादव यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.