नेटवर्किंग सेवेसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : माहिती तंत्रज्ञान विभागअंतर्गत सुरू असलेल्या आयटी-एफएमएस (फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस) आणि नेटवर्किंग व्यवस्थापन सेवेसाठी विद्यमान कंत्राटदाराला तात्पुरती तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवण्याची तयारी केली आहे.
लघुत्तम निविदाकार एमएडी इन्फोटेक प्रा. लि. कंपनीने जानेवारी २०२५ पासून पालिकेतील संगणक प्रणाली, नेटवर्किंग व्यवस्थापन आणि तांत्रिक देखभाल यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या कराराचा कालावधी जानेवारी २०२६ मध्ये संपुष्टात आला आहे. नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू असली तरी माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी व कर्मचारी विविध प्रकल्प आणि पालिकेच्या निवडणुकीशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. पालिकेतील सर्व विभागांचे दैनंदिन कामकाज संगणकीय प्रणालीवर अवलंबून असल्याने ही सेवा अखंड सुरू राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नवीन संस्था नियुक्त होईपर्यंत विद्यमान कंत्राटदारालाच मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या कालावधीसाठी सुमारे सात लाख ७१ हजार ७२० रुपये खर्च अपेक्षित असून, संबंधित खर्चास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा विषय महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.