

Kishori Pednekar
Esakal
मुंबई : पुणे येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब असून, केवळ 'लाडकी बहीण' म्हणून त्यांना संरक्षण मिळणार नाही, अशा शब्दांत मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.