मुंबई

दिवा शहरातील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाईची मागणी

CD

अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी मागणीसाठी दिवा शिळ नागरिक हक्क समितीच्या वतीने करण्यात आली. यासाठी समितीकडून सोमवारी (ता. १७) महापौर, उपमहापौर व अतिरिक्त आयुक्त, गटनेते यांना निवेदन दिले.
दिवा प्रभाग समिती हद्दीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेने अशा बांधकामांवर कठोर कारवाई करणे बंधनकारक असतानाही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, शहराच्या नियोजनावरही परिणाम होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी करून अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या वेळी समितीचे सदस्य हिरा पाटील, ॲड. रोहिदास मुंडे, सचिन पाटील, प्रकाश पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते. समितीच्या वतीने प्रशासनाने या गंभीर विषयाची तत्काळ दखल घेऊन दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT