मुंबई

भिवंडीच्या बाजारपेठांमध्ये उत्साह

CD

भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : यंत्रमागासाठी प्रसिद्ध असलेल्या भिवंडी शहरात रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर ईदची तयारी जोरात सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. विशेषतः सायंकाळी रोजा-इफ्तारीनंतर मुस्लिम कुटुंबांतील महिला व मुले कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीसाठी दुकानांकडे मोठ्या संख्येने वळत आहेत.
महिला व तरुणींमध्ये नव्या फॅशनची विशेष क्रेझ दिसून येत आहे. सूट, शरारा-घागरा, प्लाझो आणि कुर्ती यांना मोठी मागणी आहे.
यावर्षी कॅलेंडरनुसार रमजान ईद २१ मार्चला येत असल्याने खरेदीला अधिक वेग आला आहे. नवीन कपडे परिधान करून ईद साजरी करण्याची परंपरा असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य विविध डिझाईन व फॅशननुसार कपड्यांची खरेदी करत आहेत. हलक्या वजनाच्या कापडांसह जाळीदार दुपट्ट्यांच्या डिझाइन्सना महिलांची पसंती मिळत आहे. ग्राहक रझिया बेगम यांनी सांगितले, ईदला नवीन कपडे परिधान केल्याने विशेष आनंद मिळतो. यावेळी मी पाकिस्तानी शैलीचा सूट खरेदी केला. शांतीनगर येथील रुखसार यांनी या ईदसाठी शरारा सेटची निवड केली असून, दुकानांमध्ये परवडणारे व आकर्षक कपडे उपलब्ध असल्याचे सांगितले. नाझिया यांनी ऑर्गेन्झा सूट व हलक्या भरतकामाच्या कपड्यांना पसंती दर्शवली असून महिलांमध्ये या प्रकारच्या कपड्यांची मागणी वाढली आहे.
दरम्यान, खंडुपाडा, पटेलनगर, नागाव, गैबीनगर, शांतीनगर, दर्गारोड, निजामपूर आदी भागांत नव्या बाजारपेठा विकसित झाल्या असल्या, तरी कोटरगेट ते तीनबत्ती, मुख्य बाजारपेठ, प्रभुआळी या पारंपरिक भागांतच सर्वाधिक खरेदी-विक्री होत असल्याचे दिसून येते. येथे सायंकाळी ७ नंतर रात्री उशिरापर्यंत बाजार गजबजलेले असतात.

व्यापारी, दुकानदारांच्या प्रतिक्रिया
यावर्षी बाजारात महिलांच्या कपड्यांचे अनेक नवीन प्रकार उपलब्ध झाले आहेत. कॉटन प्रिंटेड सूट ३५० ते १५००, तर पाकिस्तानी सूट ८०० ते २५०० रुपयांदरम्यान विकले जात आहेत, असे कापड व्यापारी चुन्नू खान यांनी सांगितले. अंजूरफाटा येथील व्यापारी शन्नू यांनी सांगितले, ऑर्गेन्झा सूटची मागणी वाढली असून, त्यांची किंमत ८०० ते तीन हजारांपर्यंत आहे. मुलांचे कपडे ३५० ते १२०० दरम्यान उपलब्ध आहेत. दुकानदार मुन्ना यांच्या मते, ईद जवळ येताच फाटा व दिवाणशाह परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.

भिवंडी : मुख्य बाजारपेठेत ईद खरेदीसाठी गर्दी करताना नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

SCROLL FOR NEXT