मुंबई

उपनगरात धुळीचा कहर!

CD

उपनगरात धुळीचा कहर!
पुनर्विकास प्रकल्पांमुळे वाढले प्रदूषण; नागरिकांची तातडीने कारवाईची मागणी
चेंबूर, ता. १६ (बातमीदार) ः चेंबूरमधील सुभाष नगर, टिळक नगर आणि चेंबूर कॅम्प परिसरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पुनर्विकास प्रकल्पांमुळे धुळीचे प्रदूषण वाढले असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. सातत्याने सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत धूळ पसरत असून, आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
उपनगरातील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, टिळकनगर, कुर्ला, सुभाष नगर, झेंडा नगर, पेस्टम सागर, ट्रोम्बे, माहुल, कामगार नगर व देवनार नगर या भागांत जीर्ण इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, अनेक बांधकाम साईटवर धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना अपुऱ्या असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
ग्रीन नेट लावणे, नियमित पाणी मारणे, माती झाकून ठेवणे आदी उपाय अनेक ठिकाणी होत नसल्याने परिसरात धूळ उडत असून, वातावरण अस्वच्छ झाले आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांना खोकला, दमा, घसा खवखवणे तसेच इतर श्वसनविकारांचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.
पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने लक्ष घालून संबंधित बांधकामांवर नियंत्रण ठेवावे व धूळ प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

धूळ प्रदूषणामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच खोकल्यासारख्या आजारांचा त्रास होत आहे. खासगी विकसकांच्या मनमानीमुळे परिस्थिती गंभीर बनत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
अहमद मालीम, ज्येष्ठ नागरिक

धुळीमुळे खोकला, दमा, सर्दी, त्वचारोग आदी त्रास होऊ शकतात. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा आणि लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. महादेव गारळे, शल्यचिकित्सक
केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Navi Mumbai: महाराष्ट्रात मोठी ड्रग्ज तस्करी, धागेदोरे पाकिस्तानातून पंजाबमार्गे, ४० आरोपींना अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून एक- दोन नाही तब्बल ४ जणांची एक्झिट; कारण काय?

SCROLL FOR NEXT