मुरूड पोलिस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण
महानिरीक्षक संजय दराडे यांनी केली पाहणी
मुरूड, ता. १७ (बातमीदार)ः कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मुरूड पोलिस ठाण्याला नुकतीच भेट देऊन वार्षिक निरीक्षण केले. या भेटीदरम्यान त्यांनी पोलिस ठाण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत विविध विभागांची पाहणीही केली.
या निरीक्षण प्रक्रियेदरम्यान महानिरीक्षक संजय दराडे यांनी पोलिस ठाण्यातील नोंदी, शस्त्रागार तसेच परिसराची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. तसेच वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने मुरूड पोलिस दलाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत कामकाजाचा आढावा घेतला.
या वेळी रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक डॉ. आंचल दलाल, जिल्हा पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, पोलिस अधीक्षक सुयशकुमार सिंग यांच्यासह मुरूड पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश रसेडे, पोलिस उपनिरीक्षक शफिक शेख, पोलिस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे, महिला पोलिस उपनिरीक्षक अर्चना मोगरे, पोलिस मकरंद पाटील यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सोबत - फोटो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.