मुंबई

गुढी पाडवानिमित्त ठाण्यातील बाजार पेठा फुलल्या

CD

गुढीपाडव्यासाठी बाजारपेठा सज्ज
पैठणी गुढीवस्त्र आणि खणाच्या तोरणांचे आकर्षण
ठाणे, ता. १७ (बातमीदार) : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शविणारा पवित्र आणि मंगलमय सण असून, तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहात साजरा होत असल्याने त्याच्या स्वागतासाठी ठाण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. पारंपरिक खणाचे कापडी फेटे, तोरण, पैठणी गुढीवस्त्र, रेडीमेड गुढ्या तसेच विविध सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठांचा थाट अधिकच खुलून दिसत आहे. नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या ठाण्यात अनेक ठिकाणी रेडीमेड गुढ्या आणि पैठणी, गुढीवस्त्रे उपलब्ध असून, ग्राहकांच्या पसंतीनुसार ऑर्डरवरही तयार करून दिल्या जात आहेत. या गुढीवस्त्रांची किंमत साधारणतः ३५० ते १,००० रुपयांपर्यंत असून, उंचीनुसार त्यात बदल होत आहे. पैठणी साडी, नथ पैठणी, मोर पैठणी, स्वामी समर्थ पैठणी तसेच चैत्रांग गुढीवस्त्र या प्रकारांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय बाजारात रेडीमेड गुढ्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. दीड फुटापासून ते १५ फूट उंचीपर्यंतच्या गुढ्या ग्राहकांच्या मागणीनुसार तयार केल्या जात आहेत. पारंपरिक खणाच्या कापडातील भगवे, गुलाबी, पिवळे, निळे तसेच राजस्थानी शैलीतील फेटे विक्रीसाठी आले असून, विशेषतः भगव्या आणि गुलाबी फेट्यांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंनाही मोठी मागणी आहे. खणाच्या कापडी तोरणांसह फुलांचे तोरण, रेडीमेड रांगोळी साचे आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा बहरल्या आहेत. कापडी तोरणांची किंमत सुमारे ४९९ रुपयांपासून सुरू होत असून, रांगोळी साचे १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.

पारंपरिक वेशभूषेकडे तरुणाईचा कल
गुढीपाडवा म्हटले की पारंपरिक वेशभूषेचे विशेष महत्त्व असते. ठाण्यातील बाजारपेठांमध्ये रेडीमेड पैठणी साड्या, पैठणीपासून तयार केलेले लहान मुलींसाठी ड्रेस, मुलांसाठी धोतर-कुर्ता, स्लीवलेस कुर्ते तसेच इतर पारंपरिक पोशाख उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणाईसह सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह अधिक वाढताना दिसत आहे.

खणाच्या वस्तूंनी वाढवली शोभा
पारंपरिक खणाच्या कापडापासून तयार केलेली तोरणे, पर्स आणि फेटे बाजारपेठेत दाखल आहेत. खणाचे कापडी तोरण ४९९ रुपयांपासून सुरू होत असून, भगव्या आणि गुलाबी रंगाच्या फेट्यांना तरुणाईची सर्वाधिक पसंती मिळत आहे. तसेच १०० रुपयांत रांगोळीचे विविध साचेही उपलब्ध आहेत.

तरुणाईचा पारंपरिक वेशभूषेवर भर
पाडव्याच्या शोभायात्रेसाठी मुलामुलींमध्ये पारंपरिक पेहरावाची ओढ दिसून येत आहे. मुलींसाठी रेडीमेड पैठणी साडी, ड्रेस, तर मुलांसाठी धोती-कुर्ता आणि जॅकेटचे विविध प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

बाजारपेठेतील दरफलक (अंदाजे)
वस्तू दर (रुपयांत)
मुलींसाठी फ्रॉक ३०० ते ५००
पारंपरिक स्टायलिश कुर्ता ५०० पासून पुढे
पारंपरिक पैठणी साडी २,००० पासून पुढे
गुढीवस्त्र (पैठणी/चैत्रांग) ३५० ते १,०००
खणाचे कापडी तोरण ४९९ पासून पुढे
फेटा ३०० पासून पुढे
रांगोळी साचा १०० पासून पुढे


मोठ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

जुळून येती रेशीमगाठीनंतर पहिल्यांदा झी मराठीवर दिसणार ललित प्रभाकर, 'या' मालिकेत पहायला मिळणार

Navi Mumbai: मुक्या जीवांना हक्काच्या उपचारांची सुविधा मिळणार, नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू होणार; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT