मुंबई

मुंबई उपनगरात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा

CD

मुंबई उपनगरांत एलपीजी गॅसचा पुरेसा साठा
प्रशासनाचा दावा; मात्र ठिकठिकाणी रांगा सुरूच
जोगेश्‍वरी, ता. १७ (बातमीदार) : युद्धाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सिलिंडरसाठी रांगा लागल्‍या असताना मुंबई उपनगरांत एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असल्‍याचा दावा प्रशासनाने केला आहे.
कोणी गॅसचा काळाबाजार करीत असल्यास किंवा जादा दराने विक्री करीत असल्यास उप नियंत्रक शिधावाटप ‘ड’ परिमंडळ, बिलवा भवन, नेहरू रोड, सांताक्रूझ (पूर्व) येथे तक्रार करण्याचे आवाहन येथील वरिष्ठ शिधावाटप अधिकारी अश्विन रोहिणीकर यांनी केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे, की मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला एलपीजी गॅसचा साठा सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्‍याकडून पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून, गॅस एजन्सीकडे सिलिंडरची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे घरगुती गॅसचे वितरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
गॅसचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीने नागरिकांनी विनाकारण आगाऊ बुकिंग (पॅनिक बुकिंग) करू नये, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या बँकिंगमुळे यंत्रणेवर अनावश्यक ताण येऊ शकतो. तसेच समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT