बोईसर, ता. १७ (वार्ताहर) : आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरच्या टप्प्यात महसुली उद्दिष्टपूर्तीस गती देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाच्या निर्देशानुसार २६, २८, २९ व ३१ मार्चला सर्व दुय्यम निबंधक कार्यालये नियमित वेळेत कार्यरत राहणार आहेत. यामध्ये वसई (क्र. १ ते ६), पालघर (क्र. १ व २), डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा येथील कार्यालयांचा समावेश आहे. या निर्णयामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार- रविवारव्यतिरिक्त इतर दिवशी असते, त्या कार्यालयांनी दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयेही या कालावधीत सुरू राहणार असून मुद्रांक शुल्क, अभिनिर्णय आदी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.