मुंबई

ओव्हरटेकच्या नादात रिक्षाची दुचाकीला धक्का

CD

ओव्हरटेकच्या नादात रिक्षाची दुचाकीला धडक
दाम्पत्यासह तीन महिन्यांचे बाळ जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ओव्हरटेकच्या नादात रिक्षाचालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दाम्पत्यासह तीन महिन्यांचे बाळ जखमी झाल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंब्रा-कौसा येथील तक्रारदार तौसीफरजा मेहमुद शेख हे पत्नी शायदा शेख व तीन महिन्यांचा मुलगा मोहम्मद हुसेन याच्यासह दुचाकीवरून ठाणे येथून मुंब्र्याकडे जात होते. रविवारी (ता. १५) सायंकाळी दारुफलाह मशिदीसमोरून जात असताना, त्यांच्या दुचाकीला भरधाव रिक्षाचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या वेळी रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तौसीफरजा शेख यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व तिघेही रस्त्यावर पडले. या अपघातात तिघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंब्रा-कौसा येथील रिक्षाचालक साहीद मंडल याच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Dombivli: क्रिकेट खेळताना चिमुकल्यावर काळ ओढवला; हसत्याखेळत्या कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त, मुंबईत नेमकं काय घडलं?

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

SCROLL FOR NEXT