मुंबई

‘आपली संस्कृती आपला अभिमान’चा सुरेख आविष्कार

CD

‘आपली संस्कृती आपला अभिमान’चा सुरेख आविष्कार
रोह्यात साडी गौरव वॉक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहा, ता. १७ ( बातमीदार)ः जागतिक महिला दिन २०२६ निमित्त सखी मंच रोहा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साडी गौरव वॉक स्पर्धे’ला रोह्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आपली संस्कृती आपला अभिमान’ या संकल्पनेतून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात महिलांनी पारंपरिक साड्यांमधून मराठी संस्कृतीचे देखणे दर्शन घडवत आत्मविश्वास, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभावी मिलाफ सादर केला. या कार्यक्रमास नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी भेट देऊन महिलांचे कौतुक केले.
या वेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, महिला व बालकल्याण सभापती नीता हजारे, नगरसेविका तथा सखी मंचच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे, सखी मंचच्या सर्व सदस्या व रोह्यातील सहभागी महिला उपस्थित होत्या. या स्पर्धेत विविध वयोगटांतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, दागदागिने, केशभूषा, चालण्यातील डौल आणि साडी सादरीकरणातील आकर्षकता यामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला. स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत सहभागी महिलांनी उत्साहपूर्ण उपस्थिती लावत प्रेक्षकांची दाद मिळवली.
रविवारी झालेल्या समारोप कार्यक्रमात महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी नाटिका, सखी सन्मान पुरस्कार वितरण आणि बक्षीस समारंभ अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. त्यामुळे हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता महिला सक्षमीकरण, संस्कृती जपणूक आणि सामाजिक भान यांचा संदेश देणारा संस्मरणीय सोहळा ठरला.

फोटो कॅप्शन : सखी मंच आयोजित रोह्यात साडी गौरव वॉक स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT