मुंबई

मुंबई विद्यापिठ प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन

CD

मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन

धारावी, ता. १७ (बातमीदार) : मागील अनेक महिने आपल्या विविध मागण्यांसाठी पाली भाषेचे संशोधक विद्यार्थी व बौद्ध धर्मगुरू भंते विमान्सा हे मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सत्याग्रह करीत आहेत. त्यांच्या या सत्याग्रहाकडे विद्यापीठ प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे सोमवारी (ता. १६) भंते विमान्सा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आझाद मैदान येथे एकदिवसीय आक्रोश धरणे आंदोलन केले.
मुंबई विद्यापीठात ग्रामीण आणि मागासवर्गातून येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी ३०० खोल्यांचे आण्णाभाऊ साठे वसतिगृह, अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या पाली भाषेसाठी स्वतंत्र पाली भवन आणि पाली विभागाला अनुदान द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी भंते विमान्सा हे २० ऑगस्ट २०२५ पासून मुंबई विद्यापीठाविरोधात सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. दरम्यान, आंदोलकांच्या मते, भंते विमान्सा यांच्यावर मुंबई विद्यापीठाकडून त्यांचे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रकारे अत्याचार सुरू आहेत. त्यांचा पीएचडी प्रवेशही रद्द केल्याची माहिती आंदोलकांच्या वतीने या वेळी देण्यात आली. तसेच त्यांच्यावर एवढा अन्याय होत असतानाही त्यांना पोलिस प्रशासन, पाली विभागातील काही शिक्षक व विद्यापीठातील तथाकथित विद्वान व विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत नसल्याची माहिती आंदोलकांनी दिली. या एकदिवशीय आक्रोश आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या. भंते विमान्सा यांच्यावर होणारे अन्याय थांबवत त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर ॲट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. या आंदोलनाला पाली संवर्धन समन्वय समिती, जातीअंत संघर्ष समितीसह अनेक संघटनांनी मिळून आझाद मैदान येथे निषेध धरणे आंदोलन केले. या वेळी लोकशाहीर संदेश गायकवाड, सत्याग्रह आंदोलक भंते विमान्सा, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, इंद्रजित मोहिते, सीमा कसबे, मयूरी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT