पोस्को महाराष्ट्र स्टीलकडून आशासेविकांना वैद्यकीय किट वितरण
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी; १३७ सेविकांना साहित्य वाटप
माणगाव, ता. १७ (वार्ताहर) : पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत माणगाव तालुक्यातील आशासेविकांना वैद्यकीय किटचे वितरण सोमवारी (ता. १६) तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत एकूण १३७ आशासेविकांना आवश्यक साहित्य देण्यात आले.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आशासेविका गावागावात माता-बाल आरोग्य, लसीकरण, प्राथमिक उपचार आणि जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम करतात. त्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही काळाची गरज लक्षात घेऊन कंपनीने पुढाकार घेतला.
वितरित किटमध्ये मूलभूत वैद्यकीय उपकरणे, टॉर्च, बॅगसह १३ अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यामुळे दुर्गम भागात सेवा देताना मोठी मदत होणार आहे. सर्पदंशाच्या घटनांचा विचार करून ‘सापांची ओळख व प्राथमिक उपचार’ पुस्तिकाही देण्यात आली. तसेच सह्याद्री वन्यजीव संवर्धन संस्थेच्या सहकार्याने प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला जी युन पार्क (संस्थापक), महेंद्र तट्टे (महाव्यवस्थापक-प्रशासन विभाग), डॉ. दीपाली पुरी (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. दामोदर मोरे (जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी), डॉ. विनोद गोरेगांवकर तसेच पोस्कोच्या सीएसआर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आशासेविकांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांच्या सेवेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळत असल्याचे नमूद केले.
चौकट
सर्पदंश जनजागृतीवर भर
ग्रामीण भागात सर्पदंशाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिलेली माहिती पुस्तिका व प्रशिक्षण सत्र हा उपक्रमाचा विशेष भाग ठरला. यामुळे आशा सेविकांना तातडीच्या प्रसंगी योग्य प्राथमिक उपचार करून रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.
फोटो ओळ – पोस्को महाराष्ट्र स्टीलकडून आशासेविकांना वैद्यकीय किटचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.