मुंबई

ठाणे महापालिकेत ‘मेगाभरती’ला गती

CD

ठाणे महापालिकेत ‘मेगाभरती’ला गती
सहा महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया एप्रिलपासून सुरू ः हिंदू नववर्षात १,७७३ तरुणांना मिळणार रोजगार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : महापालिकेतील रिक्त पदांच्या बहुप्रतीक्षित भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागणार आहे. तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे तब्बल सहा महिने ही भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र एप्रिलपासून मेगा भरतीला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हिंदू नववर्ष स्वागतानंतर सुमारे एक हजार ७७३ तरुणांना ठाणे महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
ठाणे महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाने सेवासुविधा पुरवण्याची मोठी जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागत आहे. अशावेळी मनुष्यबळाअभावी ताण निर्माण होत आहे. एका अधिकाऱ्यावर चार ते पाच विभागांचा प्रभार असल्याने त्याचा परिणाम कामावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेने ऑगस्ट २०२५मध्ये ‘क’ व ‘ड’ वर्गातील तब्बल एक हजार ७७३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र त्यानंतर लगेचच निवडणुकांची घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू झाली आणि भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. यासोबतच आरक्षणातील तांत्रिक बाबी आणि रिक्त पदांच्या सुधारित आराखड्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. आता हे सर्व अडथळे दूर झाल्याने प्रशासनाने भरतीची प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू केली आहे.

आरोग्य विभागात सर्वाधिक संधी
१. या भरतीमध्ये अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले आहे. आरोग्य विभागात सर्वाधिक पदे भरली जाणार असून, स्टाफ नर्स (५५७), प्रसविका (११७), लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, वॉर्ड बॉय, दवाखाना आया अशा विविध पदांचा समावेश आहे.
२. अग्निशमन विभागात ३८९ फायरमन पदांची भरती होणार आहे.
३ चालक, यंत्रचालक (२७७), कनिष्ठ अभियंता, लिपिक-टंकलेखक, लेखा लिपिक तसेच अटेंडंट आणि इतर पदांचाही समावेश या मेगा भरतीत केला आहे.

एप्रिलमध्ये परीक्षेचे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, आधी अर्ज केलेल्या उमेदवारांची छाननी अंतिम टप्प्यात आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, पारदर्शकतेसाठी नामांकित संस्थेकडे जबाबदारी सोपवली आहे.

पूर्णपणे पारदर्शक
ठाणे महापालिकेच्या मेगा भरतीची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया काही काळापूर्ती थांबली होती. १,७७३ पदांसाठी सुमारे ७० हजारांहून अधिक अर्ज आले होते. त्यांची छाननी झाली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थेमार्फत राबवण्यात येत असल्याकारणाने त्यात पूर्णपणे पारदर्शकता असणार आहे. या संस्थेला पुढील प्रक्रिया करण्याची सूचना देण्यात आली असून, ठरलेल्या नियोजनानुसारच ती पार पाडली जाणार असल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Dombivli: क्रिकेट खेळताना चिमुकल्यावर काळ ओढवला; हसत्याखेळत्या कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त, मुंबईत नेमकं काय घडलं?

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

SCROLL FOR NEXT