मुंबई

क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांचा केडीएमसीवर मोर्चा

CD

क्लस्टर योजनेविरोधात २७ गावे आक्रमक
महापालिकेवर धडक मोर्चा; परिपत्रकाची होळी
डोंबिवली, ता. १७ : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या क्लस्टर योजनेविरोधात नागरिकांचा रोष उफाळून आला आहे. मंगळवारी (ता. १७) सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर धडक दिली. या वेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या परिपत्रकाची होळी करून आणि कागदपत्रे फाडून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला.
क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि प्रस्तावित बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या प्रकल्पांमुळे स्थानिक भूमिपुत्र भूमिहीन होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विकासाच्या नावाखाली आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्याऐवजी केवळ मालमत्ता कराची सक्ती केली जात आहे, असा आरोप संघर्ष समितीने केला.

योजना स्थगिती करा
२७ गावांतील क्लस्टर योजना तातडीने स्थगित करावी. या गावांच्या विकासासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा. भूमिपुत्रांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प लादू नये, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुमित वझे यांनी या वेळी दिला.

प्रशासनाचे आश्वासन
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. नागरिकांच्या भावना लक्षात घेता लवकरच महापौर, आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT