करावे स्मशानभूमीला फेरीवाल्यांचा वेढा
नेरूळ, ता. १७ (बातमीदार): सीवूड्स परिसरातील करावे गावाजवळील कै. शंकर रावजी पाटील स्मशानभूमी परिसरात फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
करावे गाव तसेच सीवूड्स परिसरातील नागरिक या स्मशानभूमीचा वापर करतात. मात्र, संरक्षण भिंतीलगतच्या पदपथावर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. सायंकाळच्या वेळी वाहन व पादचाऱ्यांची गर्दी वाढल्यावर पार्थिव घेऊन जाणाऱ्यांना अडथळे निर्माण होतात.
यापूर्वी स्मशानभूमीत शेवाळ साचणे व दहनासाठीच्या लोखंडी स्टँडची दुरवस्था अशा समस्या होत्या. स्थानिक नगरसेविका रेखा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर त्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या. मात्र, आता अतिक्रमणामुळे पुन्हा अडचणी वाढल्या आहेत.
स्मशानभूमीच्या बाजूलाच फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. सायंकाळी ये-जा करणे कठीण होते. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.