मुंबई

रमजान महिन्यात मदरशात झोपणे पडले महागात;

CD

घरफोडीत ३.५ लाखांचा ऐवज लंपास
ठाणे, ता. १७ : रमजान महिन्यामुळे कुटुंबासह राहत्या इमारतीतील मदरशात झोपणे एका वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले. यादरम्यान चोरट्याने रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा साडेतीन लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ग्रीनलॅण्ड अपार्टमेंटजवळील इमारतीत राहणारे मसूद अहमद मोहम्मद सबीत तुर्की (६२) हे रमजान महिन्यामुळे कुटुंबासह त्याच इमारतीतील मदरशात सकाळी ६.१५ वाजता झोपण्यासाठी गेले. दुपारी साडेबारा वाजता ते घरी परतले असता दरवाजा उघडा व कुलूप गायब असल्याचे निदर्शनास आले. प्रवेश करून पाहणी केली असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी असून, सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. या घटनेत कपाटातील सोन्याचे दागिने आणि २५ हजारांची रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे मिळून एकूण सुमारे ३.५ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT